Pack किंवा मास्क
|
१) मसाज झाल्यावर Pack लावावा . मास्कमुळे त्वचेचे टोनिंग होऊन घट्टपणा येतो .
२) मास्कमध्ये दोन प्रकार असतात . ‘सेटिंग मास्क’ व ‘नॉन सेटिंग मास्क’ , सेटिंग मास्कचे कार्य तेलकट त्वचेला उपयोगी ठरते .
३) त्वचेतील जास्तीचे तेल मास्क शोषून घेतो . त्यामुळे त्वचा स्वच्छ होऊन त्वचेचा पोत सुधारतो .
४) हे मास्क चेहऱ्यावर सुकून घट्ट झाले की काढावे . मास्क काढताना घासून जोराने न धुता हलक्या हाताने काढावे .
५) नॉन सेटिंग मास्क कोरडया त्वचेसाठी उपयोगी पडतात . त्वचेला चांगल्या प्रकारे आर्द्रता , थंडावा व पोषण मिळते .
६) फळांचे रस , गर किंवा पातळ चकत्या लावणे हे नॉन सेटिंग मास्कचे प्रकार आहेत . हे त्वचेवर सुकत नाहीत .
७) फेशियल पूर्ण झाल्यावर चेहऱ्याला सनस्क्रीन किंवा सौम्य मॉइश्चरायझर लावावे . त्वचा कोरडी न होता मऊ आणि तजेलदार होते .