फेसमास्क

Facemask Tips in marathi
Facemask Tips in marathi

त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात उपयोगी व परिणामकारक उपाय म्हणजे फेसमास्क .  पण फेसमास्क वापरताना त्वचेच्या पोताचा विचार करूनच फेसमास्क वापरला पाहिजे .

१)     मॉइश्चरायझिंग मास्क :-

हा कोरडया त्वचेसाठी उपयोगी असतो .  त्वचेचा ओलसरपणा वाढतो .  यामुळे त्वचेवरील डाग , खवले नष्ट होतात .  त्वचेवर हा मास्क लावून पाच ते दहा मिनिटे ठेवावा .  आकसल्याप्रमाणे वाटले की धुऊन टाकावा .  मड मास्क (माती बेस असलेले) हे तेलकट त्वचेचे अतिरिक्त तेल व घाण शोषून घेतात .  कोमट पाण्याने चेहरा धुऊन टिपावा .  मळ , मृत पेशी निघून जातात .

 

२)    एकफोलिएटिंग मास्क :-

या मास्कमुळे त्वचा तजेलदार , निरोगी राहते .  काळे डाग , त्वचेचा निस्तेजपणा या मास्कमुळे जातो .  खरबरीत भाग या मास्कमध्ये असतो म्हणून डेड स्कीन निघून जाऊन त्वचा निरोगी बनते .

 

३)    पिल-ऑफ मास्क :-

या मास्कमध्ये मऊ , मुलायम जेल असते .  सर्व प्रकारच्या त्वचेला हा उपयुक्त ठरतो .  कारण तेलकट त्वचेची रंध्रे स्वच्छ होतात व कोरडया त्वचेला पोषण मिळून त्वचा मुलायम होते .  जेल सुकला की सुटून येतो .