फेशियल

फेशियल करण्याआधी ते केव्हा , कधी व कोणत्या वयापासून करावे हा प्रत्येक स्त्रियांना पडणारा प्रश्न आहे .  वेगवेगळ्या सौंदर्यतज्ञांना या संदर्भात विचारणा केली असता काही निष्कर्ष मिळाले .  साधारण जन्माला आल्यापासून म्हणजेच वयाच्या ० शून्यव्या वर्षापासून ते १२ व्या वर्षापर्यंत स्कीन मृदू व मुलायम असते .  १२ व्या वर्षापासून शरीरात बदल होतात .  ते हार्मोनल चेंजेस असतात .  पण मुळे , मुली या वयात जाहिरातींच्या विळख्यात येऊन भुलून प्रत्येक क्रीम व इतर कॉस्मेटिक्स वापरतात .  यामुळे त्वचेचे नुकसान होते .  फक्त क्लिन्झिंग व टोनिंगची या वयात गरज असते .  रोज झोपताना कापसाने क्लिन्झिंग मिल्क वापरून चेहरा पुसावा .  म्हणजे दिवसभरातील चेहऱ्याला लागलेली धूळधाण निघून जाते .  अंघोळीनंतर टोनिंग करावे .  हातावर किंवा कापसावर घेऊन सर्व चेहऱ्याला लावावे .  म्हणजे धूळ / प्रदुषणापासून चेहरा वाचेल .

२/३ महिन्यांनी पार्लरमधून फेशियल व इतर सौंदर्य उपचार केले तरी घरी रोजच्या रोज पूर्ण शरीराची काळजी घ्यावी .  घरगुती Packs , स्वयंपाक घरातील फळे , भाज्या , धान्यांची पीठे यांची मदत यासाठी होते .  घरच्या घरी फेशियल करण्यासाठी प्रथम फेशियल करण्याच्या खास बाबी समजून घ्याव्यात .