केसांचे वाढीसाठी घरगुती उपाय

केस आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आणि सुंदर ओळख करून देण्यात नक्कीच मोलाचा वाटा उचलतात . लांब आणि आकर्षक केसांसाठी घरच्या घरी काही उपाय करता येतात . त्याबद्दल थोडस या लेख मध्ये .

१ ) कोरफडीच्या एका मोठ्या पानाला एका बाजूने चाकूने कापून त्यात मावतील  इतके मेथीचे दाने भरावेत .
२)  lamb kesकोरफडीच्या गरातील पाण्यावरच मेथीच्या दाण्यांना चार दिवसांनतर छानपैकी मोड (कोंब ) येतील. नंतर कोरफडीचे लहान लहान तुकडे करून अर्धा लिटर खोबरेल   तेलात  मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांसह उकळून घ्यावेत.
३) कोरफडीतील  पाण्याचा अंश संपेपर्यंत मंद आंचेवर तेल उकळावे अन थंड झाल्यावर बाटलीत भरून   ठेवावे .
४) रात्री झोपताना दिवसाआड केसांना लावावे .
५) मेथी व कोरफड युक्त तेलाने केस गळायचे थांबून हमकास वाढतातच.

तुम्हालाही काही अश्या घरगुती युक्त्या आणि उपाय माहिती असतील तर प्रतिक्रिये द्वारे  नक्की कळवा .

 

 

6 Comments