अनंत चतुर्दशी कथा / गणेशोत्सव कथा

ganesh chaturthi

अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.

भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.

आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास:

मानाचे गणपती

पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती:

1. कसबा गणपती
2. तांबडी जोगेश्वरी गणपती
3. गुरुजी तालीम गणपती
4. तुळशीबाग गणपती
5. केसरीवाडा गणपती

 

भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी घरोघरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल-ताशांच्या  गजरात पाठवणी केली जाते. पुणे हे गणपती विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण आहे. विविध शाळांची सांघिक कला दाखवणारी पथके, तसेच समाज प्रबोधनात्मक संदेश देणारी पथनाट्ये देखील सादर केली जातात. हे बघण्यासाठी देश-विदेशातील लोक मोठी गर्दी करतात.
तसेच अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात यालाच अनंताचे व्रत म्हणतात.

One Comment