घोळाची भाजी

(हीसुध्दा एक रानभाजी आहे .  पानं गोलसर छोटी आणि जाड असतात .)

साहित्य :-ghola

१)      घोळाचा पाला दोन वाटया

२)     ताक एक वाटी

३)     हरभरा डाळीचं पीठ चमचाभर

४)     हिरव्या मिरच्या एक-दोन

५)    मीठ , साखर

६)      पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे व हरभरा डाळ .

कृती :-

१)      घोळाचा पाला बारीक चिरून फोडणीला टाकावा .  फोडणीत मिरचीचे तुकडे टाकावेत .

२)     चांगली परतून भाजी शिजू दयावी .  शेंगदाणे व डाळ बोटचेपी शिजवून घ्यावी व फोडणीतच परतावी .

३)     वाटीभर ताकात वाटीभर पाणी व चमचाभर डाळीचं पीठ घालून नीट कालवावं .

४)     चवीला मीठ , साखर घालून ते शिजलेल्या भाजीत ओतावं . 

५)    चांगलं ढवळून उकळी आणावी .