सामाजिक संस्थांना दया मदतीचा हात…..

समाजातील गोर-गरीब, अंध-अपंग, पिडीत, दुर्लक्षित लोकांकरिता काही सामाजिक संस्था विधायक कार्य करीत असतात.donations

अशा संस्थांना आर्थिक अथवा त्यांच्या गरजेच्या वस्तुरूपी मदत करायला हवी, जेणेकरून अशा संस्थांना आपल्या कामात आर्थिक तसेच इतर अडचणी सोडविण्यास मदत होईल. देशात अशा खूप सार्या संस्था कार्यरत आहेत ज्या अपंग, अनाथ, निराधार, पिडीत, शोषित वर्गासाठी काम करतात. त्यांना सेवा पुरवितात, ज्या शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक वा इतर मदत स्वरूपात असताना. अशा संस्था प्रामाणिकपणे आपले कार्य करतात. अशा संस्थांना समाजातील प्रगत वर्गाने मदतीचा हात दिला पाहिजे. आपण केलेली मदत कुणा गरजुच्या आयुष्यातील आशेचा एक किरण असतो.

आपण दिलेल्या मदतीचा योग्य विनियोग होतोय की नाही याबद्दल काही शंका असल्यास आपण अशा संस्थांकडे त्याबाबतचा तपशीलदेखील मागवू शकतो.

One Comment