गोड दलिया

साहित्य :sweet dalia

१)      एक वाटी दालीयाचा रवा शिजवून

२)     एक वाटी ओलं खोबरं

३)     एक वाटी गुळ बारीक चिरलेला

४)     अर्धा चमचा वेलची पूड

५)    दोन मोठे चमचे साजूक तूप

६)      चवीला चिमुटभर मीठ

७)    अर्धा कप दुध .

कृती :-

१)      तूप गरम करून ओलं खोबरं , मीठ आणि गुळ घाला .

२)     मिश्रण ढवळून चिकट झालं , की त्यात शिजलेला रवा मोकळा करून घाला .

३)     दुध घाला आणि ढवळून एक वाफ द्या .  हीच कृती मायक्रोवेव्हमध्ये करता  येईल .