पालकांचा मुलीशी ‘सु’संवाद असणे गरजेचे

  सकाळी पेपर हाती पडतांच एका बातमीने मन सुन्न झाले, ‘छेडछाडीस कंटाळून तरुणीची आत्महत्या’, का वागतांत लोक असे? parents_galअर्थांत त्या मुलीने आत्महत्येइतके टोकाचे पाऊल उचलायला नको होते, मात्र स्त्रियांची छेडछाड करणे निश्चितच स्वीकारार्ह नाही. प्रत्येक गोष्टीची एक हद्द असते. एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडू शकते, मात्र तिचा ‘होकार’च असेल असे  गृहीत धरणे योग्य नाही. आपल्याला होकार अपेक्षित असला तरीही तिच्या ‘नकारा’चाही स्वीकार तितक्यांच खिलाडूवृत्तीने केला पाहिजे. शेवटी प्रत्येकाला स्वतःचा निर्णय स्वतःच घेण्याचा अधिकार आहे, जो प्रत्येकाला दिला गेला पाहिजे.
           जी मुलगी अशा टवाळखोरीने त्रस्त असेल तिने त्यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम अशा गोष्टी पालकांकडून लपवून ठेवू नयेत. सुरवातीला पालकांच्या मदतीने त्या टवाळखोरांना समजावण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा सरळ पोलिसांत तक्रार करावी.
          पालकांनीही मुलींच्या बाबतीत जबाबदारीने वागले पाहिजे. आपली  मुलगी  घरी परतल्यावर सायंकाळी थोडा वेळ तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी केल्या पाहिजे . मानसिकता ,विचार , वागणूक या वरून आपली मुलगी तणावात तर नाही ना याची जाणीव होईल . विशेषतः आईने मुलीशी खुलेपणाने बोलले पाहिजे, कारण मुली बहुतेक करून आईकडेच आपले मन मोकळे करतात. मुली आणि पालक यांच्यातील संवाद अशा घटना थांबवू शकतात. 

तुम्ही हा लेख वाचल्यानंतर तुम्हालाहि काही मार्गदर्शक असे सुचल्यास प्रतिक्रिये द्वारे कळवा . जेणे करून ह्या लेखात ते समाविष्ट करून घेऊ आणि अजून हि चांगल्या पद्धतीने हा मुद्दा आपण सर्वां पर्यंत पोहचवू