गुटखाबंदी

महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वत्र गुटखाबंदी लागू आहे. ही बंदी स्तुत्य असली तरीही बंदीची अंमलबजावणी कशी होते हे सर्वश्रुत आहे.gutkha गुटखा मिळणाऱ्या सर्वच ठिकाणी आजही गुटखा सर्रासपणे विकला जातो. अन्य राज्यात गुटखा बंदी नसल्याने तेथून गुटखा चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात येतो आणि चढ्या दराने त्याची विक्री केली जाते. गुटखा बंदीचा तसूभरही परिणाम राज्यात कोठे पहावयास मिळत नाही.

दरवेळी काही ठराविक काळापुरता गुटखाबंदी केली जाते. त्यानंतर पुन्हा गुटखा सुरु होतो. त्यापेक्ष कायमस्वरूपी गुटखाबंदी लागू कण्यात यायला हवी, जेणेकरून गुटख्याची सवय असणार्यांची सवय मुडेल आणि नवीन गुटखाशौकीन तयार होणार नाहीत.

गुटख्याचे परिणाम आता सर्वांनाच ज्ञात आहे मात्र तरीही गुटखा खाणाऱ्यांच्या संख्येत घट होत नाही. नुसती बंदी लागू करणे योग्य नाही तर राज्याच्या सीमाही सतर्क केल्या पाहिजेत. कुठल्याही चोरट्या मार्गाने गुटखा राज्यात येणार नाही याची चोख दाखल घेतली पाहिजे. मुळात गुटख्यामध्येच नशेची लथ लागणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी करावयास हवेत. याकरिता काही राष्ट्रीय मापदंड निश्चित करायला हवेत. जेणेकरून गुटखा खाणाऱ्यांच्या आयुष्याला असणारा धोका कमी होईल.