Happy Friendship Day..!

f
आज जागतिक मित्रता दिवस आहे.आपल्या आयुष्यात चांगली मित्र मिळवीत आपण आपल संपूर्ण आयुषच सुखकर बनवीत असतो.मित्र म्हणजे आपल्या सुख दुखाचा सोबती असतो,आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देण्यासाठी तो सदैव उभा असतो.जेव्हा आपल्या खिशात पैसा असतो तेव्हा आपल्याला जग दिसत आणि जेव्हा पैशे संपतात तेव्हा जगातील लोक दिसतात.मात्र अशा परिस्थितीत देखील आपला मित्र आपल्या पाठीशी असतो.
आपल्या आयुष्यात ‘मित्र’ नावाच्या प्राण्यांबरोबर घालवलेले क्षण एक अवीट गोडी घेऊन येतात. मित्र म्हणजे केवळ संकटकाळीस धावून येणारी किंवा तुम्हाला सतत समाधान, सुख मिलवून देणारी व्यक्ती नव्हे. मित्र म्हणजे अशी व्यक्ती की जिच्या सहवासात तुम्ही स्वाभाविकपणे वागता, तुम्हाला मुखवटे घालण्याची अगरज भासत नाही. अगदी मोकळेपणाने तुम्ही त्या मित्राबरोबर वागता.आपल्यापैकी अनेकांना मित्र असतातच. पण मित्र नसणारेही अनेक जण आहेत. त्यांना ’मित्र’ नसण्याची अनेक कारणे असू शकतात. असे लोक स्वत:ला काही प्रश्न विचारतात,
ज्याप्रमाणं आपण अन्न पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्या प्रमाणंच मानसिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी आपल्याला मित्रांची आवश्यकता असते. मैत्री करणं आपण टाळलं तर आपल्याला एकटेपण, नैराश्य, कंटाळा, उदासी, जीवना विषयीच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. एवढंच नव्हे तर आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीला तोंड देणं आपल्याला जमत नाही. त्यामुळे मित्र आयुष्यात जोडा म्हणजे तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही