डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

गेल्या आठवड्यापासून चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे.rupees_dollar गेल्या आठवड्यात  59.95  पर्यंत रुपया गेला होता. २२ सप्टेंबर २०११ नंतर प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर रुपयाची घसरण झाली आहे. यामुळे आयातीला जबर फटका बसणार आहे. याचा थेट परिणाम म्हणून खनिज तेल महागणार असून त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे देशाच्या चालू खात्यातील तूट वाढण्याची भीती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅंकेकने मत्ता (ऍसेट) खरेदीत कपात करण्याचे व सरकारचे पैसे वाचवण्याचे सूतोवाच केल्यामुळे रुपया घसरल्याचे निरीक्षण आहे. डॉलरमागे अधिक रुपये मिळत असल्याने गुंतवणूकदार गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेअर विक्री करत आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडण्याची आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा चालू खात्यातील तूट आणि व्यापारी तूट वाढण्याची शक्‍यता अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे.