सौंदर्यवर्धना
|
स्वयंपाकघरातील पदार्थापासून सौंदर्यवर्धनाचे उपचार
सौंदर्याची काळजी घेणे हे प्रत्येक स्त्रीला मनापासून वाटत असते . प्रथम मुलांची काळजी व नंतर घरातील इतर जणांची काळजी घेताना गृहिणी स्वत:लाच विसरतात .
चाळीशी आली की त्वचा , डोळे , केस यांच्या विविध तक्रारी सुरु होतात . ब्युटीपार्लर मध्ये वारंवार जाण्यासाठी वेळ व पैसा दोन्हींची कमतरता जाणवते .
पण प्रत्येक गृहिणींच्या हे लक्षात येत नाही की , स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांचा सौंदर्यवर्धनासाठी खूप उपयोग होतो .
स्वयंपाकघरातील पदार्थापासून स्वाद , गंध व शरीर-मनाची तृप्ती करणारे अन्नपदार्थ बनवले जातात . पण आपल्या रूपासाठी वेगळा एकही पैसा खर्च ण करता उपचार होतात . दुध , दही , तूप , मध , विविध भाज्या डाळी इ. पासून स्त्रियांना आपले सौंदर्य जोपासता येते .
१) सकाळी दुध तापविण्यापूर्वी तीन ते चार टेबल स्पून दुध वातीत काढावे . ह्या दुधाने चेहरा , मान , गळा सर्व ठिकाणी चोळावे . घरगुती क्लिन्झिंग होऊन त्वचा साफ होते . या दुधात हळदीची चिमुट , ज्येष्ठमध , अनंतमूळ , चंदन , गुलाब , खस , मंजिष्ठ , नीम , संत्रासाल , तुळशी , पुदिना यापैकी एक पावडर अर्धा टेबल स्पून टाकून चेहऱ्याला लावावे . हे जमले नाही तर हळकुंड , चंदन इ. सहाणीवर उगाळावे . वाटल्यास त्यात बदाम उगाळावे , किंचित केशर टाकून दुधात मिसळून चेहऱ्यावर , मानेवर हातांना व गळ्याला चोळून लावावे . सुकले की चेहरा चोळून्न धुवावा .
२) हातांची नखे , ओठ यांना दुधाची साय लावावी . साय लावल्यामुळे नखे मऊ राहतात . ओठांना भेगा पडत नाही व ते देखील मऊ होतात .
३) दही हे सौंदर्य वाढीसाठी उपयुक्त आहे . त्वचेचे नैसर्गिक आवरण म्हणजेच आम्ल आच्छादन अबाधित ठेवण्यास दही काम करते . Lactobasilus हे दह्यातील गुणधर्म त्वचेचे पोषण करतात , तर एन्झाइममुळे Natural क्लिन्झिंग होते . यात चंदन/लव्हेंडर/रोज असे सुगंध टाकून त्वचेला लावल्यास तेलकटपणा जाऊन त्वचा उजळते . दही केसांना पण उपयोगी आहे .
४) लोणी काढल्यावर एक टेबल स्पून लोण्याने चेहरा , हात , गळा , डोळ्याच्या आजूबाजूनं मसाज करावा . मसाजची दिशा खालच्या बाजूने वरच्या बाजूला व आतून बाहेर अशी असावी . त्यातही वाळा/गुलाब तेल टाकून सुगंधी करावे .
५) साजूक तुपाने तळपाय रात्री चोळावे . हिरड्यांना मसाज करावा . ओठांना लावावे . खूप फायदा होतो . तूप मात्र घरगुती , लोणकढे घ्यावे .
in which fruits use i facial