उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी….

Summer Heat
Summer Heat

उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी….

उन्हाळा म्हटला की अंगाची लाही-लाही होते. जबरदस्त उष्णतेमुळे चक्कर येणे, ताप येणे, अशक्तपणा ह्याचबरोबर उष्माघात होण्याचादेखील संभव असतो, ज्यामुळे रुग्ण दगावूदेखील शकतो. त्याकरीता योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. खास करून  बच्चे कंपनीची विशेष काळजी घेण्याची आवश्यक्ता असते. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक असते. यासाठी, पुढील गोष्टी कराव्यात.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे थकवा जाणवतो. हे टाळण्यासाठी क्षार व पाण्याची आवश्यकता असते. ही उणीव भरून काढण्याकरीता ताक पिणे शरीरासाठी लाभदायक असते. ह्यादिवसात लिंबू पाणी पिणेदेखील फायदेशीर असते. नारळ पाणी पिणे अधिक उत्तम. शक्य झाल्यास रोज प्यावे. कारण नारळपाणी शरीराची पाण्यासोबतच क्षाराचीदेखील गरज पूर्ण करते. शक्य असल्यास भर उन्हात बाहेर जाणे टाळावे.

One Comment