गुगल कसे वापरावे….?

गुगल कसे वापरावे….?google_logo

गुगल हे एक सर्च इंजिन आहे. म्हणजे इंटरनेटवरील असे संकेतस्थळ की ज्यावर आपल्याला हवी असलेली माहिती कुठे मिळेल याच्या लिंक्स उपलब्ध होतात. गुगलच्या होम पेजवर आपल्याला लिहिण्यासाठी एक जागा असते. त्यात आपल्याला हवी असलेली माहिती संक्षिप्त स्वरूपात टाकून एन्टर दाबले अथवा त्याच्या बाजूला असलेल्या ‘सर्च आयकॉन’वर क्लिक केले की आपल्याला हव्या असलेल्या माहितीचे स्त्रोत खाली दिसू लागतात. हे स्त्रोत म्हणजे आपल्याला हवी असलेली माहिती ज्या संकेतस्थळाच्या ज्यापानावर असेल त्याचा इंटरनेटवरील अचूक पत्ता असतो. पुढे त्या पत्त्यावर जाऊन आपण हवी असलेली माहिती मिळवू शकतो. आपल्याला हवी असलेली माहिती एखादी फाईल, फोटो, व्हीडीओ अथवा ऑडीओ क्लिप असली तरीही मिळविता येते.

2 Comments