मानवी मेंदूही होणार संगणकावर अपलोड….!

संगणक क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. brain_computingत्यांतच इंटरनेटचा वापर भरमसाट वाढला आहेत. ऑडीओ, फोटो, व्हिडीओ अपलोड अथवा डाऊनलोड करण्यासाठी अथवा इतर अनेक गोष्टींसाठी ग्रामीण भागातील लोकही इंटरनेटचा वापर करतात. आता तर चक्क मानवाचा ‘मेंदु’देखील संगणकावर अपलोड करता येईल असा विश्वास काही भविष्यवेत्त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते २०४५ मध्ये मानवी मेंदू संगणकावर अपलोड करणारे तंत्रज्ञान अस्तित्वात येईल.   

मागील आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये ‘ ग्लोबल फ्युचर २०४५ ‘ ही भविष्यवेत्त्यांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती.  ह्या परिषेदेत जगभरातील नामवंत संशोधक सहभागी झाले होते. या परिषदेचा मुख्य उद्गाता होते , रशियाचे अब्जाधीश दिमित्री इसकोव्ह , संशोधक आणि सध्या ‘ गुगल ‘ च्या अभियांत्रिकी विभागाचे संचालक रे कुर्झविल . या परिषदेत सहभागी संशोधकांनी आगामी तीस वर्षांतील तंत्रज्ञानाच्या गरुडझेपेविषयी चिंतन केले. २०४५ पर्यंत सर्व स्तरांतील तंत्रज्ञान मानवी मेंदूला पिछाडीवर टाकण्याची करामत करू शकेल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .

सन २१०० पर्यंत मानवनिर्मित रोबो मानवी मेंदूला चांगली टक्कर देऊन पुढे जातील , असा विश्वास परिषदेत सहभागी संशोधकांच्या दुसऱ्या गटाने व्यक्त केल्याचे ‘ लाइव्हसायन्स ‘ ने म्हटले आहे . ‘ मूर्स लॉ ‘ नुसार दर दोन वर्षांनी कम्प्युटिंग पॉवर सुमारे दुपटीने वाढत असते . ‘ मानवी मेंदूप्रमाणे वेगवान आणि अचूक गणना करणारे तंत्रज्ञान येऊ पाहात आहे . मानवी मेंदूची क्षमता ही अचूक असली , तरी मर्यादित आहे . मात्र , हे नवे तंत्रज्ञान मानवी बुद्धीपेक्षा एक अब्ज पटींनी विस्तारण्यास सक्षम आहे ,’ असे कुर्झविल यांनी स्पष्ट केले . यासाठीची पूर्वतयारी म्हणून ‘ ब्रेन कम्प्युटर इंटरफेस ‘ अर्थात ‘ बीसीआय ‘ तयारी करण्यात येत आहे . बार्कले येथील ‘ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ‘ तील जोस कार्मेन आणि मायकल महार्बिझ हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर ‘ ब्रेन कम्प्युटर इंटरफेस ‘ च्या निर्मितीत व्यग्र आहेत . 

One Comment