आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013

काल कर्डिफ येथे झालेल्या आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीतील ICC-champions-trophy-2013उपांत्य फेरीतील सामन्यांत भारताने श्रीलंकेवर ८ गडी आणि तब्बल १ ५ शतके राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरींत दिमाखात प्रवेश मिळवला. अंतिम फेरींत भारताची गाठ यजमान इंग्लंड संघाशी पडेल. काल झालेल्या सामन्यांत केवळ ३३ धावा देवून ३ बळी मिळविणाऱ्या इशांत शर्माला ‘सामनावीर’ पुरस्कार देऊन गौराविण्यात आले.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा विश्वचषक स्पर्धेनंतरची सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. ही स्पर्धा ‘मिनी वर्ल्ड कप’ म्हणूनही ओळखली जाते. यंदाची स्पर्धा ही शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा असेल असे आय.सी.सी.ने यापूर्वीच जाहीर केले आहे. आतापर्यंत ६ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाल्या असून ही सातवी.


पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९९८ साली बांगलादेशांत आयोजित केली गेली होती. ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यांत वेस्ट इंडिजला नमवून दक्षिण आफ्रिकेने अजिंक्यपद मिळविले होते.
दुसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन २००० साली केनियांत केले गेले होते. भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान नैरोबी येथे अंतिम सामना झाला होता. भारताला नमवून न्यूझीलंडने विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.
तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २००२साली श्रीलंकेत झाली होती. ह्या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह भारत अंतिम सामन्यांत पोहोचला होता. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी तसेच अंतिम सामन्यासाठी राखून दिवशीही झालेल्या मुसळधार पावसाने सामना रद्द करावा लागला. भारत आणि श्रीलंका संघाला संयुक्त विजेतेपद बहाल करण्यांत आले.
चौथी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २००४ साली इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. अंतिम सामन्यांत यजमान वेस्ट इंडीजने इंग्लंड संघाला २ गडी राखून नमवत धक्कादायक विजय मिळविला होता.
पांचवी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २००६ साली भारतांत भरविली गेली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवीत अजिंक्यपद मिळविले होते.
सहावी चौथी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २००९ साली दक्षिण आफ्रिकेत खेळविली गेली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यांत विजय मिळवीत ऑस्ट्रेलियाने विजेतेपद कायम राखले होते.