पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांची चॅंपियन्स ट्रॉफीमधून हकालपट्टी…
|आयपीएल-६ मध्ये उघडकीस आलेल्या आणि सध्या गाजत असलेल्या
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात रोज नवनवीन लोकांची भर पडत असून त्याची व्याप्ती चांगलीच वाढलीय. आता तर त्यात सामन्यादरम्यान निर्णय देणारा पंचही अडकल्याची बाब समोर येतेय. पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांचे नाव सध्या ह्या प्रकरणात घेतले जातेय. त्याचीच शिक्षा म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आय. सी. सी.) ने चॅंपियन्स ट्रॉफीमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविलाय.
“आयपीएलमधील स्पॉट फिक्सींग प्रकरणात रौफ सहभागी असल्याच्या माध्यमांच्या वार्तांकनामुळे रौफ यांना चॅंपियन्स ट्रॉफीसाठीच्या पंचाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले.
असद रौफ याधीही एका वादात अडकले होते. मॉडेल लीना कपूर हिने त्यांच्यावर शारीरिक संबध ठेऊन फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले होते.