इडली

idli recipe in marathi
idli recipe in marathi

साहित्य :-

१)      एक वाटी रवा

२)     एक वाटी दही

३)     पाऊण चमचा फ्रुटसॉल्ट

४)     पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

५)    एक चमचा किसलेलं आलं

६)      चवीनुसार मीठ

७)    फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल

८)     मोहरी , हिंग , कढीपत्ता प्रत्येकी अर्धा चमचा

९)      जाड कुटलेली मिरी आणि सुकी मिरची .

कृती :-

१)      दह्यात अर्धी वाटी पाणी घालून घुसळावं .  त्यात आलं-मीठ , रवा आणि कोथिंबीर घालून मिश्रण डावानं पडेल इतपत सैल भिजवावं .

२)     यात फ्रुटसॉल्ट घालून सर्व चांगलं फेसावं आणि मिनी इडलीचा साचा वापरून इडल्या कराव्या .

३)     नॉनस्टीक पैनमध्ये तेल तापवून फोडणीचं साहित्य घालावं आणि त्यावर इडल्या झटपट परताव्या .

४)     गरम , गार कशाही चांगल्या लागतात .  सोबत मिरच्या-कोथिंबीरीची दह्यात कालवलेली चटणी दयावी .