IFSC code म्हणजे काय ?

आपण bank च्या रोजच्या वापरातील एका टेक्निकलगोष्टी विषयी माहिती करून घेऊ

जेव्हा तुम्ही इंटरनेट द्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तेव्हा तुम्हाला बँक मध्ये पैसे ट्रान्सफर करत असताना नेहमी एक बँकेचा कोड विचारला जातो,त्याच्या शिवाय पैसे ट्रान्सफर करणे शक्यच नाही. तो IFSC code असतो.

IFSC code चा फुल फॉर्म आहे Indian finance system code म्हणजेच भारतीय वित्त प्रणाली संहिता. हा प्रत्येक बँकेचा एक युनिक कोड कोड असतो. 11 कॅरेक्टर असलेला या कोडमध्ये इंग्लिश अल्फाबेट व अंक असतात. भारतातील प्रत्येक बँकेच्या शाखेला Reserve Bank Of India ने IFSC code दिलेला आहे.

हा कोड प्रत्येक शाखांना उपलब्ध आहे ज्या शाखा NEFT transaction system ची सुविधा उपलब्ध करून देत असतात. या कोड मुळे आपण सहज पद्धतीने पैशांचा व्यवहार करू शकतो.

आपण इंटरनेटच्या मदतीने पेमेंट करत असतो तेव्हा हा कोड महत्त्वाचा असतो. RTGS, NEFT, CFMS यांसारख्या बँकिंग system चा उपयोग करताना आयएफसी कोड मुळे आपली चुकण्याची शक्यता खूप कमी असते.

IFSC code हा 11 character चा कोड असतो, ज्यात पहिले चार कॅरेक्टर इंग्रजी अक्षर म्हणजे अल्फाबेट्स असतात की जे बँकेचे बँकेच्या नावाची माहिती देत असतात, तर पाचवा कॅरेक्टर हे अंक 0 असतो,जो भविष्यात एखादी नवी ब्रांच ओपन केली तर तिला देण्यासाठी हा अंक राखून ठेवला आहे. पुढील सहा अंक ही ब्रांच कोड दाखवीत असतात म्हणजे ती बँक कुठे स्थित आहे.

IFSC Code कसा प्राप्त होणार …..

1 ) Cheque book : प्रत्येक बँकेचे चेक बुक हे वेगवेगळे असतात,चेक बुक ने व्यवहार करणे हे अतिशय विश्वासनीय,

तुमच्या चेक बुक वर तुमचा IFSC code असणार,काही बँकेच्या चेक बुक वर तो खाली असतो तर काही बँकेचे चेक बुकमध्ये तो वरती असतो.

2 ) Bank Account Passbook : तुम्हाला मिळालेल्या बँकेच्या पासबुक मध्ये जिथे तुमचा अकाउंट नंबर असतो, तुमचे नाव असते तिथेच अकरा अंकी आहे IFSC code देखील असतो.

3 ) Website

तुम्ही वेबसाइटच्या मदतीने सहज प्राप्त करू शकतात IFSC Code , तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या ब्राउजर वरून IFSC code वेबसाईट सर्च करावी. तिथे उपलब्ध असलेल्या बँकेतून तुमची बँक निवडावी. त्यानंतर राज्य निवडावे.

तुमच्या जिल्ह्यातील तालुका निवडून तुमच्या ब्रांच नाव शोधताच तुम्हाला तेथे आयएफएससी कोड प्राप्त होईल.