अपघातामध्ये अवयव तुटल्यास काय कराल?

एकदा तुटलेले झाडाचे पान पुन्हा त्याठिकाणी तसेच लावणे दुरापास्त! doctorह्यावरूनच एक म्हणही प्रचलीत आहे, ‘तोडणे सोपे, जोडणे अवघड’! मानवी अवयावांचेही असेच. एकदा तुटून शरीरावेगळा झालेला मानवी अवयव पुन्हा त्याचं ठिकाणी जसाच्या तसा प्रत्यारोपित करणे अशक्यप्राय गोष्ट असल्याचे मानले जाते. मात्र दिल्लीतील एका घटनेवरून आता ही गोष्टही शक्य असल्याचे निदर्शनास येते.

     गुरगावमधील पुष्पांजली हॉस्पिटलमध्ये “किडनी तज्ज्ञ” असणा-या डॉ. महेंद्र नारायण सिंग यांनी प्रसंगावधानाने स्वत:चा हात वाचवला. महेंद्रच्या या प्रसंगावधानाने त्याच्यावर ऑपरेशन करणारे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले.

     रविवारी दुपारी दीडच्या सुमारास महेंद्र आणि त्यांचे वडील उत्तरप्रदेशमधील तुंडला येथून यमुना एक्सप्रेसवर हायवेवरून दिल्लीला जात होते. पाण्याची बाटली भरण्यासाठी ते हायवेवरील एका ढाब्यावर थांबले. महेंद्र यांचे वडील बाटली भरण्यासाठी ढाब्यामध्ये गेले असताना महेंद्र हायवेच्या कडेलाच गाडीमध्ये बसून होते. त्यावेळी अचानक उत्तरप्रदेशवरून दिल्लीच्या दिशेने जाणा-या एका भरधाव गाडीने महेंद्र यांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. काही सेकंदात हा अपघात घडला. वेगाने आलेल्या गाडीने डॉ. महेंद्र यांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. ह्या धडकेंत त्यांचा उजवा हात तुटला. त्यांच्या हातातून रक्तस्त्राव होत होता. तुटलेला हात त्यांच्यापासून अंदाजे ५० मीटर अंतरावर रस्त्यात पडला होता.  वादिंच्या मदतीने त्यांनी तुटलेला हात सोबत घेतला. जेथून हात वेगळा झाला होता त्या भागावर वडिलांकडून कापड बांधून घेतले. किडीनी ट्रान्सप्लॉन्टच्या दरम्यान ऑपरेशनसाठी किडनी पुन्हा बसवताना ते अवयव योग्यरित्या जपले पाहिजेत हे हे त्यांना ज्ञात होते. म्हणून त्यांनी तो तुटलेला हातही ढाब्यावरुन घेतलेल्या बर्फाच्या पिशवीत घालून कैलाश हॉस्पीटलमध्ये घेऊन आले. तेथे डॉ. महेंद्र यांना तातडीने प्रथमोपचार देण्यात आले. त्यांच्या तुटलेला हातही साफ करण्यात आला. त्यामुळे त्यांची शुद्ध न हरपता त्यांना श्री गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे लगेचच डॉक्टरांनी महेंद्रवर ऑपरेशन करुन त्यांचा हात पुन्हा त्याच्या शरीराला जोडला. चार तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये महेंद्रच्या हातामधील धमन्या आणि शिरांचे जटील ऑपरेशन करण्यात आले. पुढील धोका टाळण्यासाठी लवकरात लवकर ऑपरेशन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अपघातामध्ये अवयव तुटल्यास काय कराल?

> तुटलेल्या अवयवाला लगेचच बर्फच्या पिशवीत किंवा थंड जागी ठेवा.

> ज्या ठिकाणी अवयव तुटला आहे त्या ठिकाणी कापडाने बांधुन ठेवा.

> थेट मोठे हॉस्पिटल शोधण्याऐवजी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावून तुटलेला भाग आणि अवयव निर्जंतुकीकरण करुन घ्या.

> बोटे, पंजा यासारखे अवयव तुटल्यास ते व्यवस्थीत जपून ठेवल्यास आठ ते बारा तासामध्ये त्याचे ऑपरेशन केल्यास ते पुन्हा जोडता येऊ शकतात.

> संपूर्ण हात किंवा पाय तुटल्यास त्याला जोडण्यासाठी सहा तासात ऑपरेशन करणे गरजेचे असते.

4 Comments