स्वतःची ओळख..
|प्रत्येक व्यक्ती स्वःताची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असतो.
त्याला स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करायचे असते. म्हणूनच तर तो नेहमी कुठल्या ना कुठल्या संधीच्या शिधात असतो. स्वतःची ओळख अर्थातच नाव आणि कर्म याची प्रसिद्धी असते. त्यासाठीच तर सारी धावपळ सुरु असते.
स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर समाजात जो मान-सन्मान मिळतो, आदराचे स्थान मिळते त्याचे वर्णन शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही. समाज हि एक अंधार कोठी आहे. एखादया कुटुंबात जन्म घेतलेल्या व्यक्तीला पहिली ओळख मिळते ती त्याच्या नावाची. नाव मिळाल्यानंतर व्यक्ती धडपडत असते ते नाव मोठे व प्रसिद्ध करण्यासाठी.
अशी ओळख निर्माण झाल्यावर जो मान सन्मान मिळतो त्यातून त्या व्यक्तीला समाजात अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत असते. तेव्हाच त्या व्यक्तीला योग्य समाधान मिळते.
One Comment
अगदी बरोबर आहे , आपण नेहमी स्वत: च्या ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो