नौकावहनासाठी मदत करणारा उपग्रह भारताचा पहिला उपग्रह

नौकावहनासाठी अचूक दिशा दाखवण्यासाठी मदत करणारा भारताचा पहिला उपग्रह येत्या १ जुलै रोजी आकाशांत झेपावेल. sateliteनौदल तसेच व्यावसायिक जहाजांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे इस्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
‘आयआरएनएसएस-१ए’ असे या उपग्रहाचे नाव आहे. हा उपग्रह फक्त नौकावहनासाठी दिशादर्शनाचे काम करणार आहे. ह्या उपग्रहाचे आयुर्मान १० वर्षे आहे. हा उपग्रह १ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी२२ या रॉकेट लाँचरच्या साहाय्याने अवकाशात झेपावेल. उपग्रहाच्या उड्डाणासाठी ६४ तासांच्या उलटगणतीला २९ जून रोजी सुरुवात होईल. उपग्रहाच्या सर्व पूर्व चाचण्या घेतल्याची माहिती इस्रोचे प्रवक्ते देवीप्रसाद कर्णिक यांनी पीटीआयला दिली. इस्रोचे हे २४ वे अभियान आहे.
हा एक्सएल आवृत्तीचा चौथा उपग्रह आहे. यापूर्वीही नौकावहनासाठीचे ६ उपग्रह भारताने अवकाशात सोडलेले आहेत. मात्र ह्या उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या उपग्रहाकडे केवळ नौकावहनाचे काम असणार आहे. यामुळे खवळलेल्या समुद्रातही अचूक दिशा दाखवणे शक्य होईल.