भारताचेही यान झेपावेल मंगळाच्या दिशेने…..

अंतराळ विश्वांत झपाट्याने प्रगती करणाऱ्या भारतीय अवकाश space_shuttleसंशोधन संस्था अर्थात इस्त्रो येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत आपल्या शिरपेचांत मानाचा आणखी एक तुरा रोवणार आहे. इस्त्रोने मंगळ मोहीम आखलेली आहे जी येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत सुरु होईल. मंगळावर जाण्याकरीता इस्त्रोचे यान श्रीहरिकोटा येथून उड्डाण करेल. इस्त्रोच्या ह्या महत्वाकांक्षी मंगळ मोहिमेकरिता अमेरिकेची विख्यात अंतराळ संस्था ‘नासा’नेही मदत करण्याची तयारी दर्शविलेली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज दिलेल्या निवेदनांत इस्त्रोच्या ह्या मोहिमेकरिता अवकाशातील दूरवरच्या अंतरावरील ट्रॅकिंगसाठी आवश्‍यक असणारे तांत्रिक सहाय्य नासाकडून दिले जाणार असल्याचे नमूद करण्यांत आले आहे.

विकसनशील राष्ट्रांपैकी केवळ भारत असे राष्ट्र आहे की ज्याच्याकडे आकाशांत अंतराळ यान प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. अनेक विकसनशील राष्ट्रांकारीता स्वस्त दरांत अंतराळ यान प्रक्षेपित करण्याचे काम भारत करतो. एवढेच काय फ्रांस आणि रशिया ही राष्ट्रे देखील काही वेळा भारतातून अंतराळ यान प्रक्षेपित करतात. आता मंगळ मोहीम आखल्यानंतर ती यशस्वी झाल्यावर भारताची अंतराळविश्वांत अधिक प्रगती होणार आहे.

One Comment