भारतीय उपग्रह मंगळाच्या कक्षेत

mangal_mission

अभिनंदन ! आता भारत जगातील असा पहिला देश आहे ज्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रित्या मंगळाच्या कक्षेत आपला उपग्रह प्रस्थापित केला . भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार केली . मंगळ मोहिम फत्ते करणारा भारताला हा जगातील चौथा देश ठरला आहे.

जगातील विविध देशांनी आजपर्यंत मंगळावर 51 मोहिमा आखल्या असून, त्यातील केवळ 21 यशस्वी झाल्या आहेत. त्यातल्या त्यात भारताने अतिशय कमी खर्चात हि कामगिरी केल्या बद्दल आमच्या टीम कडून सर्व शास्त्राज्ञ , इस्रो आणि भारतीयांचे अभिनंदन . तसेच भारताच्या पुढील अंतराळातील उपक्रमांना आमच्या शुभेच्च्छा !