Internet, एक ज्ञानकुंभ!

internet in marathi
internet in marathi

प्रत्येक घटकाबद्दलची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेली आपल्याला आढळते. अगदी घरातील किचन मध्ये एखादा

नवीन पदार्थ बनवायचा असेल आणि त्याची रेसिपी आपल्याकडे उपलब्ध नसेल इथपासून तर एखादया डॉक्टरला रोग्यावर

उपचार करण्यासाठी एखादा संदर्भ हवा असेल इथपर्यंत सर्व माहिती आपण इंटरनेटवर सहजरीत्या मिळवू शकतो. जवळपास

सर्वच खासगी तसेच सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, रुग्णालये, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने ई. सर्व

इंटरनेटवर आपले एक संकेतस्थळ उघडून त्यात आपली माहिती प्रकाशित करतात. परीक्षेचा अर्ज असो वा नोकरीचा अर्ज

तो देखील भरण्याची व्यवस्था इंटरनेटवर आढळते. सर्वच वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळे आज उपलब्ध आहेत

आणि त्यावर सर्व बातम्या प्रकाशित करतात. कला, साहित्य, क्रीडा, वैज्ञानिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय सर्वच

क्षेत्रातील माहितीचा खजिना इंटरनेटवर उपलब्ध आहे. पूर्वी, कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा संदर्भ

हवा असेल तर वाचनालयातील त्याविषयासंदर्भातील पुस्तकात तो शोधला जाई, मात्र आता काळ बदलला असून अशा अडचणी

इंटरनेटवर माहिती शोधून सोडविल्या जातात. सध्या इंटरनेटवर सोशल नेटवर्किंग वेबसाईटची विशेष धूम आहे. ज्यामध्ये आपण

आपल्या मित्रांशी कायम संपर्कात राहू शकतो, नवनवीन मित्र बनवू शकतो, आपले मत मांडू शकतो, विविध विषयांवर चर्चा

घडवू शकतो. अशा वेबसाईटमुळे लोक देशातील काही सामाजिक प्रश्नांवर एकत्र येऊन क्रांतीची मशाल पेटविण्याचे कार्य

देखील करताना गेल्या काही घटनांमधून जाणवते. उगाच इंटरनेटला “माहितीचे मायाजाल” म्हटले जात!