नोकरीसाठी मुलाखत देतेवेळी घ्यावयाची काळजी….

नोकरीसाठी मुलाखत देतेवेळी घ्यावयाची काळजी….tips

१.      धुम्रपान करून, च्विंग-गम अथवा लसूण खाऊन मुलाखतीला जाऊ नका.

२.      मुलाखतीसाठी योग्य अअसाच पोशाख परिधान करा.

३.      आपला रीज्युम स्वतःसोबत असू दया.

४.      मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेवर पोहोचा.

५.      मुलखतिअगोदर सदर करायच्या अर्जावर अचूक माहिती भरा. त्यासोबत दिलेल्या कागदपत्रातील आणि रीज्युममधील माहितीशी ही माहिती तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.

६.      मुलाखत घेणाऱ्यास त्याच्या आडनावाने संबोधून स्पष्ट उच्चारात अभिवादन (ग्रीट) करा.

७.      साधे हळुवार हस्तांदोलन करा.

८.      एकदा पूर्ण खोली नजरेखालून घाला. नंतर मुलाखत घेणार्यावर आपले लक्ष केंद्रित करा.

९.      तुमच्या जवळील खुर्चीत तुम्हाला बसण्यास सांगण्यापर्यंत प्रतीक्षा करा.

१०.  आपला वावर अतिशय व्यावसायिक असू दया. जर काही नियंत्रणाबाहेर जात असेल तर विनोदीअर्थाने घ्या.

११.  उत्साही रहा. आपण उत्तरे देतांना आणि तेथे असेपर्यंत आपली देहभाषा उत्साही असू दया.

१२.   आपले उत्तर ‘हो किंवा नाही’पेक्षा जास्त असू दया, मात्र जास्त वेळ घेऊ नका.