आता एसएमएसद्वारे बुक होणार रेल्वे तिकीट
|आता रेल्वे आरक्षणासाठी मोठमोठ्या रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अथवा इंटरनेटवर जाण्याची गरज नाही. येत्या १ जुलैपासून मोबाइलद्वारे एसएमएस पाठवून रेल्वेचे तिकीट आरक्षित करता येईल. या एसएसमएस सेवेचा क्रमांक लवकरच जारी होणार आहे. या बुकिंगवर एका एसएमएससाठी ३ रुपये शुल्क आकारले जाईल. पेमेंट शुल्क म्हणून पाच हजारांपर्यंतच्या तिकिटावर पाच रुपये, तर त्यापेक्षा अधिक रकमेसाठी १० रुपये आकारले जाईल. प्रवाशाला आपल्या मोबाइलवरून रेल्वे क्रमांक, प्रवासाचे ठिकाण, तारीख, श्रेणी, स्वत:चे नाव, वयाची माहिती असलेला एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर त्याला एमएमआयडीकडून एक पासवर्ड मिळेल. या माध्यमातून तिकिटाचे शुल्क अदा केले जाईल. ते जमा झाल्यानंतर तिकीट बुक होईल.
One Comment
?