Its Happen Only in India…!

o
काहीही जगावेगळ आपल्या कडे घडलं कि Its Happen Only in India असे आपण सर्रास म्हणतो.पण कधी हा विचार केलाय का?कि हे फक्त आपल्या भारतातचं का शक्य आहे.दुसर्या देशात हे का घडत नाही.
आपला भारत देश हा विविध जाती,धर्म,संस्कृती,ह्यांनी समृध्द असा जगातील एकमेव विशाल लोकसंख्या असणारा आणि वेगवेगळ्या स्वभावाच्या विचित्र लोकांचा देश आहे. हो..हो..विचित्रचं म्हणावं लागेल.कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आपल्याला या देशात बघायला मिळतात.त्यामुळे काहीतरी जगावेगळ घडावं असा अट्टाहास बाळगणारी माणसे इथे गल्लोगली सापडतात.शिवाय कायदा आणि प्रशासन यांचा कुठलाही संबंध नसणारी महाभाग पण इथे सापडतील ज्यांना स्वातंत्र्य आणि लोकशाही म्हणजे काय?हेच मुळी ठाऊक नाही.
म्हणजे बघा कुण्या एका मांत्रिकाने पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून लोकांच्या तिजोऱ्या खाली केल्या,पैशांनी भरलेल्या तीन ट्रक सापडल्या पण त्यांचा मालक आजवर कळाला नाही.महाराष्ट्राचे मंत्रालय जाळण्यात आले,तिहार जेल मधून कैदी पळून गेले.कुण्या शोभान सरकारच्या सांगण्यावरून जमिनीत सोने शोधले आणि खोदलेही गेले पण हाती काहीच लागले नाही,साईबाबा देव नाही असा शिक्कामोर्तब झाला.अच्छे दिन च्या अमिषात नको तेही निवडले गेले.सचिन तेंडुलकरला कायदा बदलून भारतरत्न देण्यात आले,सचिन,रेखा खासदार असूनही संसदेत कधी गेले नाही,हे सर्व फक्त भारतातचं घडू शकत..! किती विनोदी वाटतात ह्या घटना पण त्या तितक्याच वास्तव दर्शी आहेत.
मिडिया म्हणजे न्याय व्यवस्था आणि CBI म्हणजे बोलका पोपट अशी स्थिती आपण अनुभवत आहोत.या देशात ambulance पेक्षा pizza लवकर पोहचतो,इथला प्रत्येक व्यक्ती स्वताला मागास म्हणून घेण्यासाठी धडपडतो.इथे दारूची दुकाने सरकार मान्य आहेत आणि शाळा कायम विना अनुदानित….इथला गरीब हा रेशन कार्डाने ओळखला जातो.इथे गांधींपेक्षा त्यांचा फोटो असणाऱ्या नोटा अति महत्वाच्या आहेत…अशी हजारो लाखो उदाहरणे रोजच्या जगण्यात आपण अनुभवतो….बदल घडावा ह्यासाठी वल्गना करतो मात्र स्वताहून काही करण्याची गरज आली तेव्हा मात्र गप्प बसतो आणि म्हणत राहतो Its Happen Only in India…!
मजेशीर बाब म्हणजे अजुन जगावेगळ आपल्याकडे काय काय घडत हे जर आपल्याला बघायचं असेल तर google वर Its Happen Only in India अस type करा आणि images search करा हसून हसून लोट पोट होणार अशा images आपल्याला बघायला मिळतील.एकदा तरी प्रयत्न करून बघाचं.