कच्च्या केळ्याचा कबाब मसाला

साहित्य :-kela kabab

१)      कच्ची केळी तीन

२)     बटाटे दोन मध्यम

३)     आलं-लसूण पेस्ट

४)     काश्मिरी मिरची पेस्ट

५)    पनीर शंभर ग्रॅम

६)      कोर्नफ्लॉवर चार चमचे

७)    काजू व चेरी सजावटीसाठी

८)     कोथिंबीर चिरलेली

९)      चवीनुसार मीठ . 

रश्श्यासाठी :-

१)      टोमाटो चार-पाच

२)     कांदे चार-पाच

३)     काजूची पेस्ट दोन चमचे

४)     तेल , चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      प्रथम कच्ची केळी व बटाटे उकडून घ्यावेत .  नंतर ते गरम असताना   कुस्करून घ्यावे व त्यात आलं-लसूण पेस्ट , मिरची पेस्ट एक-एक चमचा , चवीप्रमाणे मीठ , थोडी कोथिंबीर , पनीर किसून कोर्नफ्लॉवर घालून चांगलं  मळून घ्यावं .  त्याचे लांबट कबाब करून तेलात तळून घ्यावे . 

२)     टोमाटो-कांदे यांची मिक्सरवर ग्रेव्ही तयार करावी .  काजूची पेस्ट करून घ्यावी . 

३)     अर्धी वाटी तेलावर आलं व लसूण पेस्ट दोन चमचे , काश्मिरी मिरची पेस्ट दोन चमचे घालून परतून घ्या . 

४)     नंतर त्यावर वाटलेली ग्रेव्ही घालून टोमाटो , कांदा शिजेपर्यंत चांगलं तेल  सुटेपर्यंत परतावं . 

५)    नंतर त्यात हवं तेवढं पाणी घालून थोडं उकळावं व त्यात काजूची पेस्ट घालावी .  

६)      म्हणजे ग्रेव्ही जरा दाटसर होते .  नंतर कबाब घालून लगेच गैस बंद करावा . 

७)    थोडा वेळ तसंच ठेवावं म्हणजे भाजीत रस छान जिरतो व वरून थोडे तळलेले काजू , चेरी पनीर किसून व कोथिंबीर घालून सजवावं .  ही गरम गरम ‘कबाब मसाला भाजी’ पोळी , पराठा याबरोबर खूप छान लागते .