गतविजेते केकेआरचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात…..!

KKR
KKR

आयपीएल च्या ५व्या पर्वातील विजेते कोलकाता नाईट रायडर्सचे आयपीएल-६ मधील आव्हान संपुष्टात आले असून आज पुणे वारीयार्स इंडियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना ७ धावांनी पराभव पत्करावा लागला.

आजच्या सामन्यातील कोलकाताच्या डावातील १८ वे षटक अतिशय वादग्रस्त ठरले. युसूफ पठाण ७२ धावांवर बहारदार फलंदाजी करत कोलकाताला विजय मिळवून देईल असे वाटत असतांनाच तो वादग्रस्तरीत्या धावबाद झाला. युसुफ पार्नेलच्‍या चेंडूवर चोरटी धाव घेत असतांना पार्नेलने दोन्ही हातांनी युसुफला अडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी युसुफने पायाने चेंडू दूर लोटत धाव पूर्ण केली. मात्र पंचांनी युसुफला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याच्या मुद्द्यावरून धावबाद घोषित केले.

मात्र पार्नेल दोषी असल्याने आपल्याला संशयाचा फायदा मिळायला हवा म्हणून युसुफ यावर नाराज झाला.