उन्हातलं पोर

फिरतांना सहज नजर रस्त्याच्या आजू-बाजूला पडली की , कामं करणारे हात मजुरांची मंडळी , आपल्या कामात दंग झालेली दिसते .Construction आणि संध्याकाळच्या भाकरीच्या घडणीचा विचारात मग्न राहून , आजूबाजुचं ग्लोबल आणि प्रगतशील जगच विसरून जातात .  जग कुठे चालले आहे याचा विचार न करता आपली काम करत असतात .  आज आपण इतके ग्लोबल आहोत पण यात त्यांचा मोलाचे श्रेय विसरून जातो .  आपली फोर व्हीलर गुळगुळीत रस्त्यावर फिरवतो , पण त्याला लागलेल्या कष्टाळू हातांचा विसर आपल्याला पडतो , विकासाचा प्रत्येक पाया या मजुरांपासून रचला जातो , याचे आपल्याला भान राहत नाही .  आज प्रत्येक मॉलची वीट त्या हातांनी रचली गेली आहे , स्याटेलाइटचा स्क्रू त्या हातांनी घट्ट आवळला जातो , तरीही हा व्यक्ती इतर सर्व गोष्टींपासून उपेक्षितच राहतो .