‘लापतागंज’ पुन्हा छोटया पडद्यावर….

‘लापतागंज’  लहानापासून तर मोठ्यांना सर्वानाच आपल्या विनोदी मोहात टाकणारी मालिका .lapataganj पुन्हा एकदा सब टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

    ही मालिका १0 जून २0१३ पासून रोज रात्री १0 वाजता सब टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेने यापूर्वीच लोकांच्या मनात घर केले असून नावीन्यपूर्ण विषय हाताळले जातात. लोकांच्या भावनांना वाट करून देण्याची किमया या मालिकेत आहे. पहिल्या पर्वात या मालिकेत लापतागंजमधील रहिवासी आपल्या कल्पक बुद्धीने अनेक परिस्थितींवर मात करत सुखाचे जीवन कसे जगतात, याचे चित्रण करण्यात आले होते. या मालिकेत सुचेता खन्ना, रोहितश्‍व गौर हे प्रमुख भूमिकेत असणार असून त्यांना साथ देणार आहेत ते विनीत कुमार, संजय चौधरी, अब्बास खान, आदिती तेलंग, शुभांगी गोखले, अनुप उपाध्याय, कृष्णा भट्ट, राकेश श्रीवास्तव आदी कलाकार. या मालिकेचे दिग्दर्शन अश्‍विनी धीर यांनी केले असून निर्मिती गरिमा प्रॉडक्शनने केली आहे.

पुन्हा एकदा लापतागंज बघायला सब टीव्हीचे दर्शक आतुर झालेले आहेत.