जीवनाश्यक औषधे होणार स्वस्त

medicines_and_drungsमहागड्या औषधांमुळे उपचार घेणे कठीण झालेल्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी येतेय. दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी नवीन धोरण अवलंबले जात आहे. त्याचाच परिपाक म्हणून जीवनावश्यक औषधांसह ३४८ औषधांच्या किमती ८०%पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. कॅन्सररोधक आणि ऍन्टीइन्फेक्‍टिव्ह औषधांच्या किमतीही सुमारे ५० ते ८० टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सविस्तर वृत्त येथे वाचा….

दरवर्षी कित्येक लोक महागडी औषधे न घेऊ शकल्यामुळे प्राण गमावतात. काही लोक उपचार मध्येच सोडून मरणाची वाट बघत असतात. अशा सर्वांना नक्कीच आशादायी ठरणारे हे धोरण असेल. मात्र ह्या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावयास हवी.