लोकमत ऑक्सीजन

lokmat oxygen
lokmat oxygen

“ऑक्सीजन”, दैनिक “लोकमत” सोबत दर शुक्रवारी प्रसिद्ध होणारी पुरवणी, खरेतर आजच्या धका-धकीच्या आणि स्पर्धेच्या युगात तरुणाईला मार्गदर्शक ठरेल असा हा “ज्ञानकोषच” आहे! तरुणाईला आपल्या करीअर सोबतच दैनंदिन जीवनात तसेच आरोग्याविषयक उपयुक्त ठरेल असा ज्ञानसाठा ह्यात प्रकाशित केला जातो! दहावी-बारावीनंतर काय? पासून तर जिवनात स्थीर-स्थावर झाल्यानंतर समोर उभ्या राहणाऱ्या कौटुंबिक जबाबदारी व ताणतणाव ई. चा यशस्वी सामना कसा करावा याचे यथोचित मार्गदर्शन ह्यात आढळते! तरुणाईला स्पर्धात्मक व संघर्षमय युगात विविध समस्यांना तोंड देत असतांना निर्माण होणाऱ्या आरोग्याविषयक तक्रारींवर मार्गदर्शन करणारे उत्कृष्ट लेखदेखील ह्यात आढळतात, जे निश्चितच अवलंबण्याजोगे आहेत. तरुणाईच्या आवडी-निवडी, विचारशैली, जीवनशैली, कार्यशैली अधिक प्रगल्भ करण्याचा विचार ह्या पुरवणीतून प्रसूत होतो! दैनिक “लोकमत”च्या ह्या विधायक उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!

दैनिक “लोकमत”च्या ह्या विधायक उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!