बारावीचा निकाल ३० मे रोजी….!

दहावी-बारावीची परीक्षा संपली की विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता असते ती निकालाची. 12th
मे महिना संपत आला की हीच उत्सुकता शिगेला पोहोचते. यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रतीक्षा आता संपत आली आहे, कारण, येत्या ३० मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून ही परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तस्स जाहीर करण्यात आलं. ३० मे रोजी जाहीर होणारा हा निकाल ‘ऑन लाईन’ जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर पहायला मिळेल.

निकाल पाहण्यासाठी ‘http://www.msbshse.ac.in’ ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी.