महाराष्ट्राचा विजय झोल भारतीय ज्युनिअर क्रिकेट संघाचा कर्णधार

                   ऑस्ट्रेलियात जून-जुलै महिन्यात होणार्‍या तिरंगी मालिकेत सहभागी होणार्‍या भारतीय ज्युनिअर क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी जालना येथील विजय झोलची नियुक्ती झाली आहे. आयपीएल ६ मध्ये राजस्थान रॉयल्सतर्फे खेळताना दमदार कामगिरी करणार्‍या संजू सॅमसनला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. विजय झोल च्या यशानंतर लवकरच महाराष्ट्राचा झेंडा पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघात विजय लवकरच घेऊन उतरेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही . या तिरंगी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे नक्कीच बघण्यासारखे असेल . कारण कि भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो . मग तो ज्युनिअर संघ असो कि सिनियर .

One Comment