पोलीस भरतीत परप्रांतीयांनाही प्रवेश

policeपोलीस भरतीत यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत प्रयत्न घेणाऱ्या मराठी तरुणांना धक्का देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. झी चोवीस तास ने दिलेल्या बातमीनुसार पोलीस भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी ‘वय व अधिवास प्रमाणपत्र’ (डोमिसाईल सर्टीफिकेट) सादर करण्याची अटच राज्य सरकारने रद्द केल्याचा निर्णय आज जाहीर केला. ह्यामुळे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या असंख्य मराठी तरुणांची घोर निराशा झाली आहे.

सविस्तर वृत्त येथे वाचा…

 

महाराष्ट्रात १५ वर्ष वा त्याहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांना ‘वय व अधिवास प्रमाणपत्र’ देण्यात येते. पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवाराला हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. म्हणजे तो महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे असा त्यामागचा उद्देश होता. आता मात्र नवीन नियमानुसार परराज्यातील तरुण देखील पोलीस भरतीसाठी पात्र ठरतील. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ह्या धोरणावर राज्यातील विविध पक्ष-संघटना काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

One Comment