मान्सून

Mansoon 2013
Mansoon 2013

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे हैराण झालेल्या जनतेचे लक्ष आता येणाऱ्या ‘पावसाळ्या”कडे लागले आहे. त्यातच एक दिलासा देणारी बातमी येतेय. दैनिक दिव्य मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून येत्या दोन-एक दिवसात अंदमान-निकोबार येथे दाखल होण्याची चिन्हे आहेत. सविस्तर बातमी येथे वाचा
                      वातावरणातील बदलांमुळे पावसाळ्याची चाहूल लागली आहे. राज्यातील अनेक शहरातील तापमान झपाट्याने खाली येत आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाळासदृश्य वातावरण तयार होत आहे. मात्र, पाउस पडण्याची शक्यता मात्र धूसर आहे असेही हावामान खात्याच्या सूत्रांकडून कळते. भारतात नेहमीपेक्षा यंदा मान्सून एक-दोन दिवस आधीच दाखल होत असून साधारणतः ९८ टक्के पाउस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.