मराठी पाऊल पडे ‘एव्हेरेस्ट’वर…..!

Everest

संपूर्ण मराठीजनांना अभिमान वाटावा अशी घटना आज घडली. गणेश मोरे, आनंद माळी आणि भूषण हर्षे ह्या मराठमोळ्या तरुणांनी जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एवरेस्ट’ सर केले. ह्या तिघा गिर्यारोहकांनी आज दि.१७/५/२०१३, शुक्रवारी दुपारी ‘माउंट एवरेस्ट’वर तिरंगा फडकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’ मोहिमेंतर्गत त्यांनी ही कामगिरी केली.

“गीरीप्रेमि’चाच आशिष माने याने काल जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर ‘ल्होत्से’ यशस्वीरीत्या सर केले. प्रतिकूल हवामानाचा सामना करीत त्याने हे यश संपादन केले. ल्होत्से शिखर सर करणारा तो महाराष्ट्राचा पहिलाच तर भारताचा चौथा गिर्यारोहक ठरला आहे.

सर्व यशस्वी गिर्यारोहकांचे तसेच ‘गिरीप्रेमी’ संस्थेचे m4marathi च्या टीमकडून मनःपूर्वक अभिनंदन!

One Comment