आयुष्याच्या वळणावर………….

आयुष्याच्या वळणावरrahul
धडपडत चालताना
धडपडता धडपडता
कधीतरी आपटतो जीव
खूप लागलं तर नाही ना
पाहत पुन्हा चालू पडतो
वाटेत सतत खाचखळगे
अडचणी येताच राहतात
पण चालणं कधी
थांबत का ?
आयुष्याच्या शेवटच्या
क्षणापर्यंत चालतच राहायचे  असते
अडखळत धडपडत पाऊल
नेहमी पुढेच टाकायचे असते
आयुष्य जगताना कितीही दुखः आली तरी
स्वप्न पाहणे का सोडायचे असते
जीवन जगताना मरणांतिक वेदना मिळाल्या
तरीही जगणे का सोडायचे असते …….

 

5 Comments