दंगल ……!!!

जाणिवा पेटल्याo0450034211316747791
सरणांवर   …….
रस्त्यारस्त्यावरच्या   …….!
हसतात  ……….
वीक्राळ -विकट ज्वाळा
द्वेषाच्या   ……… !
हादरून
घरात दडलो मी
कळलेच नाही
कधी बेघर झालो मी  ……. !
पाहून सारा थरारा
अश्रु गोठून गेले
कळलेच नाही रक्ताचे
कधी पाणी झाले   ……. !
लाचार झाल्या वेदना
आकांत पाहुनी जखमांचा
धुकट -भकास शहरांत
फिरताना  ……!
कळवळल्या सा-या संवेदना  …… !
“सरहदे ” दूर जरी आखल्या
इथे घराघरांच्या भिंती
रक्ताने माखल्या   ……!
इथे जागवित ठेवती  “अनेक”
खदखदता दवेष तळाना   …… !
कोण , कोठून  येइल केंव्हा
सांधाया फाटलेल्या मनांना
सांधाया फाटलेल्या मनांना  ……!!!

“समिधा “