मसाला पराठा

साहित्य :-masala_paratha

१)      प्रत्येकी एक चमचा धनेपूड

२)     जिरे पूड , तेल किंवा बटर

३)     कांदा मसाला किंवा गरम मसाला

४)     चिरलेली कोथिंबीर

५)    अर्धा चमचा मीठ

६)      पाव चमचा पिठीसाखर

७)    दोन-तीन चमचे तीळ

८)     सहा पोळ्यांची कणीक (नेहमीचच) .

कृती :-

१)      कणकेचा एक गोळा घेऊन पिठीवर फुलक्याएवढी पोळी लाटावी .

२)     मग नेहमीप्रमाणे तेल वा बटर लावावं .  तीळ सोडून इतर सर्व मसाले        एकत्र कालवावे  .

३)     त्यापैकी एक चमचा मसाला लाटलेल्या फुलक्यावर पसरावा व त्याची गुंडाळी   करून चकलीप्रमाणे घट्ट वळवावी , दाबावी व पिठी आणि तिळावर जाडसर   लाटावी .  तेल सोडून हा पराठा खरपूस भाजावा .  सॉसबरोबर वाढवा .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *