‘व्हॉट्स-अॅप’वर तिरंगा फडकविण्यासाठी आंदोलन…
|आज सकाळी Whats App वर एक मेसेज आला त्यात होते ” चीन, जपान, कोरिया, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया व स्पेन ह्या देशांचे राष्ट्रध्वजांच्या स्टिकर्स Whats app Par India Ka Flag Kyu Nahi Hai Forward This message till the Admin Wakes Up”.
सध्याच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात ‘व्हॉट्स-अॅप’ हे स्मार्ट-फोन युझर्सचं अतिशय आवडतं अॅप्लीकेशन! भारतात तर कोट्यावधी ‘व्हॉट्स-अॅप’ युझर्स आहेत. मात्र हेच कोट्यावधी युझर्स ‘व्हॉट्स-अॅप’वर सध्या काहीसे नाराज झाले आहेत! याचे कारणही तसेच आहे. मुळात, ‘व्हॉट्स-अॅप’चे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ‘स्टिकर्स’! मेसेज पाठवितांना त्याला साजेशा भावना प्रदर्शित करणारी स्टिकर्स ह्या अॅप्लीकेशनमध्ये उपलब्ध आहेत. ह्या स्टिकर्समध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, चीन, जपान, कोरिया व स्पेन ह्या देशांच्या राष्ट्रध्वजांच्या स्टिकर्सचाही समावेश होतो. मात्र भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्टीकरचा ह्यात समावेश नाही. हेच भारतीय युझर्सच्या नाराजीचे कारण आहे!
भारतीयांचे तिरंग्यावर अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याने ही नाराजी साहजिकच आहे. त्यातच पुढील महिन्यात भारताचा स्वातंत्र्यदिन येऊ घातलाय. त्याच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ ऑगस्टपर्यंत भारताचा तिरंगा ‘व्हॉट्स-अॅप’वर फडकविण्याचा चंग ह्या करोडो भारतीय युझर्सने बांधलाय! त्यासाठी त्यांनी अनोखे ‘आंदोलन’ सुरु केले आहे. हाय गुड मॉर्निंग, व्हॉट्सअॅप ब्रो? असे मेसेज तर ‘व्हॉट्स-अॅप’वर नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, त्याबरोबर ‘’व्हॉट्सअॅप वर भारताचा झेंडा का नाही? हा प्रश्न फॉर्वर्ड करत रहा… व्हॉट्सअॅपचे प्रशासन जागे होईपर्यंत स्वस्थ बसू नका. १५ ऑगस्टपर्यंत भारताचा झेंडा व्हॅट्सअॅपवर आलाच पाहिजे.’ असा मेसेज पाहायला मिळत आहे. अपेक्षेप्रमाणे ह्या आंदोलनाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळ्याच ग्रुपमध्ये हा मेसेज पोस्ट करायला सुरुवात झाली असून फेसबुकवरही ह्या संदर्भातील काही पेजेस आणि ग्रुप सुरु झाले आहेत.