मेथी

       मेथी हि आरोग्यवर्धक वनस्पती आहे. ती पाने व बिया स्वरोपात वापरली जाते.मेथीची पाने व मोड आलेले मेथी दाने भाजी म्हणून वापरत येते. कसुरी मेथी या नावाने ओळखली जाणारी मेथी वाळलेली सुगंधित पाने विविध पदार्थात वापरली जातात. मेथीचे उत्पादन अनेक देशात घेतले जाते. भारतात मुख्यत्वे मेथीचे उत्पादन राजस्थान तेथे सर्वाधिक घेतले जाते. लोणची, रस्भाज्यात वापरली जाणारी मसाले यात मुख्यत्वे मेथीचा वापर केला जातो. अनेक भागात मेथीदाणे हे माधुमेहावारचे औषध म्हणून वापरले जाते. प्रसूती नंतरच्या काळात अर्भकाला दुध पाजणार्या स्त्रियांच्या दुधात वाढ व्हावी म्हणून त्यांच्या आहारात मेथी दाण्याचा वापर केला जातो. मेथी औषधी वनस्पती असल्यामुळे ती अक्खी किंवा चूर्ण स्वरुपात  वापरली जाते. अनेकदा आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव आणण्यासाठी विविध पदार्थात वापरली जाते. मेथी वजन कमी करण्याचे उत्तम साधन आहे. रात्री अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास वजन कमी होते. कंबर दुखीवर चांगले औषध आहे. थंडीच्या दिवसात डिंकाच्या लाडूमध्ये मेथीचा वापर करतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *