पालेभाजीची थालीपीठ

साहित्य :-thalipeeth 5

१)      ताकात केलेली चाकवत

२)     मेथी , शेपू अशी कोणतीही पालेभाजी

३)     ज्वारीचं पीठ

४)     डाळीचं पीठ

५)    तिखट , कांदा

६)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)    भाजीत बसेल एवढी ज्वारीचं पीठ , थोडं डाळीचं पीठ घालावं .  चवीनुसार       मीठ , तिखट घालावं .

२)    आवडत असल्यास कांदा बारीक चिरून घालावा .  पीठ चांगलं मळून त्याची थालीपीठ करावीत .

३)     गरम खायला दयावीत .  वेगळ्याच चवीची ही थालीपीठ सगळ्यांना नक्कीच आवडतील .  ( काही वेळा वांगं भाजून केलेलं भरीत ही उरतं .  या भरतातही ज्वारीचं पीठ , डाळीचं पीठ व तिखट-मीठ घालून त्याची थालीपीठ करता येतात .  ही थालीपीठही अतिशय खमंग लागतात .)