मुलांना चांगले संस्कार द्या

‘मुले देवाघरची फुले’ से म्हटले जाते. ह्या फुलांना कुठल्या माळेत गुंफायचं याची काळजी लहानपणापासूनच पालकांनी घ्यायला हवी. kidमुळे ज्या परिसरात वावरतात त्याबाबत दक्षता घ्यायला हवी. लहानमुले कोवळ्या मनाची असतात. त्यांच्या कानावर पडणारा प्रत्येक शब्द, घटना अथवा त्यांच्या डोळ्यासमोर घडणारा प्रसंग कायमस्वरूपी त्यांच्या मनात घर करून राहतो. अशा गोष्टी सकारात्मक असल्या तर त्याचा चांगला परिणाम दिसून होतो, मात्र दुर्दैवाने अशा गोष्टी नकारात्मक असल्या तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आयुष्यावर होण्याचाही धोका असतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहून चांगले चांगले संस्कार त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या घरातील वातावरणाचा सर्वाधिक परिणाम मुलांवर दिसून येतो. घरातील वडीलधारे आपसांत जितके मिळून-मिसळून, गुण्या-गोविंदाने राहतील तितका मुलांचा स्वभाव शालीन आणि समजूतदार होईल. ज्या स्त्री-पुरुषात आपसात समन्वय नसतो आणि सतत भांडणे होत असतात त्यांची मुळे स्वच्छंदी आणि उद्धट बनण्याचा धोका सर्वाधिक असतो.
म्हणूनच मुलांवर चांगले संस्कार करतांनाच पालकांनी आपसातील संबंध सुदृढ करायला हवेत. मुलांच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम करणारी कुठलीही कृती करण्याचे नेहमी टाळावे.

 

2 Comments