आपली मुंबई ठरली जगातील दुसरे प्रामाणिक शहर……

index  आपल्या मुंबईने प्रामाणिकपणात जगात दुसरा क्रमांक मिळविला! न्यूयॉर्क, मॉस्को, लंडन सारख्या ‘पुढारलेल्या’ शहरांना मागे टाकून मिळविलेला दुसरा क्रमांक निश्चीतच मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरतो!

हि पाहणी कोणा भारतीय किंवा आशियाई संस्थेने केलेली नाही, तर न्यूयॉर्कमधील ‘रिडर्स डायजेस्ट’ ह्या मासिकातर्फे जगातील महत्वाच्या १६ शहरांमध्ये प्रामाणिकपणा तपासणारी एक चाचणी घेण्यात आली. प्रत्येक शहरातील १२ मोक्याच्या ठिकाणी तिथल्या चलनी नोटा, छायाचित्रे आणि संपर्क क्रमांक भरलेली बारा पाकिटे टाकण्यात आली. पाकिटातील उपलब्ध माहितीच्या आधारे त्यातील जितकी जास्त पाकिटे निश्चित पत्त्यावर मिळतील त्यानुसार प्रामाणिकपणाची क्रमवारी ठरविण्यात येणार होती. यात फिनलंड मधील हेलसिंकी शहर अव्वल ठरले असून मुंबईचा क्रमांक दुसरा आला आहे. सोळा शहरात टाकण्यात आलेल्या एकूण १९२ पाकिटांपैकी केवळ निम्मीच पाकिटे परत आल्याची नोंदही ‘रिडर्स डायजेस्ट’ तर्फे घेण्यात आलेल्या ह्या चाचणी दरम्यान करण्यात आली आहे. अव्वल आलेल्या हेलसिंकी शहरात टाकलेल्या एकूण १२ पाकिटांपैकी ११ पाकिटे निश्चित पत्त्यावर पोहीचाविली असून मुंबईतील ९ पाकिटे निश्चित पत्त्यावर पोहोचली. केवळ एक पाकीट निश्चित पत्त्यावर पोहोचवून पोर्तुगालची राजधानी लिस्बनने तालाचा नंबर मिळविला आहे.

भारतातील सत्ताधारी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून कितीही अप्रामाणिकतेचे दर्शन घडवीत असली तरीही इथले सर्वसामान्य नागरिक मात्र तसे नाहीत हेच ह्या पाहणीतून एकप्रकारे सिद्ध होत आहे! ते काहीही असले तरीही मुंबईला हा मान मिळवून देणारे प्रामाणिक मुंबईकर नक्कीच कौतुकास पत्र आहेत! त्यांच्या प्रामाणिकतेला सलाम!

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *