मटण दो प्याजा

mutton do pyaja
mutton do pyaja

साहित्य :-

१) एक किलो मटण

२) चार ते पाच मोठे कांदे उभे चिरलेले

३) चार टोमाटो , दोन बटाटे

४) दोन इंच आले , एक लसणीचा कांदा

५) एक टेबल स्पून धने

६) एक टेबले स्पून जिरे हे सर्व एकत्र वाटून

७) दोन वाटया तेल तळण्यासाठी

८) तीन ते चार लवंगा

९) तीन ते चार तुकडे दालचिनी

१०) चार ते पाच वेलची , दोन तमालपत्र

११) एक टेबले स्पून दही

१२) एक चमचा हळद , तीन चमचे तिखट

१३) एक चमचा गरम मसाला पावडर

१४) धने-जिरे पावडर एक चमचा

१५) चवीपुरतं मीठ .

कृती :-

१) एक कांदा उभा पातळ चिरावा . एका मोठया कांदयाचे आठ तुकडे करून प्रत्येक तुकड्याची एक-एक पाकळी सुटी करून तेलात जरा नरम करून घ्यावी .

२) तेल तापवून उभा चिरलेला कांदा कुरकुरीत तळून घ्यावा .

३) नंतर लवंग , दालचिनी , वेलची , तमालपत्र टाकून उरलेला कांदा चिरून टाकावा व परतून घ्यावे .

४) त्यावर मटण टाकून हळद , तिखट , मीठ , धने , जिरे , आले-लसूण गोळी व गरम मसाला टाकून ढवळावे व शिजू द्यावे . दही , बटाट्याच्या फोडी व टोमाटो टाकणे .

५) मटण शिजल्यावर त्यात नरम केलेल्या कांदयाच्या पाकळ्या व दोन टोमाटोच्या मोठया फोडी टाकून ढवळावे व वाढताना तळलेला कांदा व कोथिंबीर टाकावी .