मटण पुलाव

mutton pulao

साहित्य :-

१)      एक किलो मटण

२)     तीन वाटया बासमती तांदूळ

३)     अर्धा किलो कांदे , दोन टोमाटो

४)     एक वाटी तेल , अर्धा वाटी तूप

५)    तिखट , हळद ,

६)      गरम मसाला , लवंग

७)    दालचिनी , वेलची , तमालपत्र

८)     एक टेबल स्पून आले-लसूण गोळी

९)      चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      तेलात लवंग , दालचिनी फोडणी करून कांदा टाकावा .  कांदा चांगला ब्राऊन झाल्यावर टोमाटो व आले-लसणीची गोळी टाकून परतावी .

२)     नंतर दोन चमचे तिखट , दोन चमचे गरम मसाला , अर्धा चमचा हळद , चवीनुसार मीठ व बेताचे पाणी टाकून शिजवावे .  शिजल्यावर एकदम सुके करावे .

३)     तांदळात मीठ टाकून मोकळा भात करून घ्यावा .  मोठया भांडयात अगर कढाईत तूप टाकून लवंग , दालचिनी , तमालपत्र व वेलचीची फोडणी करून मटण टाकवे .      व थोडा वेळ परतावे .

४)     गरम मसाला अर्धा चमचा व भात टाकून यांचं एकत्रित मिश्रण तयार करावं .

५)    एखादे वेळी घरात शिजवलेले अगर नुसते थोडे मटण शिल्लक असेल तर आयत्यावेळी असा पुलाव केला तरी वेळ भागते .

One Comment